क्रीडा क्षेत्रात पाठबळ देण्याच्या दृष्टीने कुरुंदवाडात तालुक्याचे क्रीडा संकुल उभारणी करणार – आमदार यड्रावकर

Spread the love
कुरुंदवाड / प्रतिनिधी
कुरुंदवाड शहराला ऐतिहासिक वारसा आहे.क्रीडा क्षेत्रात या नगरीने अनेक खेळाडू घडवले आहेत.शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त करत नाव लौकिक केले आहे.शहरातील मुलांना क्रीडा क्षेत्रात पाठबळ देण्याच्या दृष्टीने शहरात तालुक्याचे क्रीडा संकुल उभारणी करणार असल्याचे आश्वासन आमदार डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी कुरुंदवाड येथील जैन सांस्कृतिक भवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण करणे जैन समाज संस्कृती भवन बांधणेसह शहरातील11 कोटी 9 लाख रुपयांच्या विविध विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात दिले.कुरुंदवाड पालिकेच्या मुख्याधिकारी टीना गवळी,माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, रामचंद्र डांगे,दादासाहेब पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.यावेळी आम.डॉ.पाटील-यड्रावकर पुढे म्हणाले
छत्रपती शिवाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरण माझ्या हस्ते संपन्न होत असल्याचा आनंद असून या नगरीच्या झोपडपट्टी नियमितकरण,नूतन पाणी पुरवठा आणि महापुराचा ही प्रश्न ही लवकरच निकाली काढणार असल्याचे सांगितले.स्वागत प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष सुनील चव्हाण यांनी केले.सुनील कुरुंदवाडे रामदास मधाळे,अँड विजय जमदग्नी,श्रीकांत माळी,बाळासाहेब कुंभार,इकबाल पटवेगार, दादासाहेब पाटील,आनंद कुंभार आदींनी मनोगते व्यक्त केली.आभार महिपती बाबर यांनी मानले.यावेळी पालिकेचे अभियंता प्रदीप बोरगे,उदय डांगे,रमेश भुजुगडे,जय कडाळे,उदय डांगे, तानाजी आलासे,दीपक गायकवाड,रामभाऊ मोहिते,वकील विजय जमदग्नी, फारूक जमादार,महावीर पाटील,अक्षय आलासे,सुरेश बिंदगे,राजेंद्र घारे,शब्बीर भिलवडे, महिपती बाबर,रवीकिरण गायकवाड,
चंद्रकांत पोवार,उमेश कर्णाळे,आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!