गळीत हंगामास पहिली उचल ४ हजार रुपये जाहीर करा – आंदोलन अंकुश

Spread the love

इचलकरंजी पंचगंगा साखर कारखान्याने 22 व 23 मधील दुसरा हप्ता द्यावा मागील हंगामाचे फायनल 3 हजार 500 व चालूला हंगामाला पहिली उचल 4 हजार रुपये जाहीर करावी.पं

चगंगा कारखान्यांने उस गळीत हंगाम 22 व 23 मध्ये गेलेल्या ऊसाला ठरल्याप्रमाणे दुसरा हप्ता 50 रुपये तात्काळ द्यावा.तसेच साखर व उपदार्थातुन नफा कारखान्यांना झालेला आहे . त्यामुळे मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता दिवाळीपूर्वी देऊन 3 हजार 500 रुपये फायनल कराव.दरवर्षी प्रमाणे पंचगंगा कारखान्यांने उच्चांकि दराची परंपरा कायम राखत चालू गळीत हंगामालासुद्धा पहिली उचल 4 हजार रुपये जाहीर करून कारखाना चालू करावा. अशा आशयाचे निवेदन आज पंचगंगा सहकारी साखर कारखाना लिज युनिटचे हेड श्री सावंत यांना देण्यात आले.याबाबत मुंबईतील कार्यालयाशी संपर्क साधून त्वरित निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.त्याचबरोबर गेट केनचा लांबून ऊस आणण्यापेक्षा भागामध्ये यंत्रणा टाकून जवळच्या ऊस उत्पादकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली.यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश जगदाळे, तालुकाध्यक्ष दीपक पाटील, संभाजी माने,संपत मोडके धनंजय जगनाडे इत्यादी कार्यकर्ते  उपस्थित होते.

error: Content is protected !!