शिरोळ येथे ऐतिहासिक दसरा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

Spread the love

६२ वर्षाची परंपरा असलेल्या शिरोळ येथील ऐतिहासिक दसऱ्यानिमित्त शहरात जय भवानी ५ तोफेची सलामी देऊन दसरा उत्सव साजरा केला जातो.आज छत्रपती शिवाजी महाराज तख्त येथून शिवकालीन ऐतिहासिक जय भवानी तोफ ही फुलांनी सजवून शहरातील मुख्य रस्त्यावरून वाद्याच्या गजरात व मानाच्या दोन बैल जोडीच्या साह्याने नदिवेश येथील दसरा चौक येथे आणण्यात आली.या ऐतिहासिक दसरा सोहळ्याला गावातील श्री दत्त मंदिर,रेणुका मंदिर,बिरोबा मंदिर,विठ्ठल मंदिर,राम मंदिरातील पालख्या सहभागी झाल्या होत्या. आज शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता दसरा चौक येथे ऐतिहासिक जय भवानी तोफेचे पूजन करून माजी सैनिक दगडू कांबळे,शिवाजी गावडे, संजय इंगळे,सामजिक कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे,नगर अभियंता श्रीधर डुबुले या मान्यवरांच्या हस्ते तीन तोफेच्या फैरी उडवण्यात आल्या. यानंतर येथील ग्रामस्थांकडून आपट्याच्या पानाचे सोने लुटण्यात आले. त्यानंतर दसरा चौकातून शिवकालीन जय भवानी तोफ गावातील मुख्य मार्गावरून वाजत गाजत शिरोळचे ग्रामदैवत बुवाफन मंदिर येथे आणण्यात आली.बुवाफन मंदिराच्या पटांगणावर ऐतिहासिक जय भवानी तोफेच्या मानाच्या दोन फैरी उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके व पाटील घराण्याचे नागेश पाटील यांच्या हस्ते उडवण्यात आल्या.हा ऐतिहासिक उत्सव पाहण्यासाठी शहरातील लहान मुलासह, महिला,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी माजी नगरसेवक,नगरसेविका शहरातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.

error: Content is protected !!