शरद पॉलिटेक्निकमध्ये १९ ला ऑरनेट स्पर्धा
शिरोळ / प्रतिनिधी
यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकमध्ये शनिवार ता.१९ ऑक्टोंबर रोजी ‘ऑरनेट २के२४’ या राष्ट्रीय स्तरावरील टेक्निकल स्पर्धेचे आयोजन केले आहे.शरद इन्स्टिट्युट व आय.एस.टी.ई., नवी दिल्ली अंतर्गत स्टुडंट चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन केले आहे.यामध्ये पेपर प्रेझेन्टेशनसह दहा विभागात विविध स्पर्धा होणार आहेत.स्पर्धेतील विजेत्यांना संस्थेमार्फत प्रमाणपत्रसह एक लाख रूपयांपेक्षा अधिक बक्षिसे देण्यात येणार आहेत.संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे प्रमुख उपस्थित आहेत.पेपर प्रेझेन्टेशनमध्ये सर्व विभागातील विविध विषयावर शोध निबंध सादरीकरण होणार आहे.कॅड मास्टर, मॉक इंटव्ह्यु, थ्रीडी मॉडेलिंग, क्विझ कॉम्पिटेशन, कोड फेस्टा (सी प्रोग्रॅमिंग), क्विक बझू, लेथ वॉर, सॉलिड वर्कस् मास्टर, रोबो रेसींग अशा स्पर्धा होतील.या स्पर्धेच्या माध्यमातून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यामध्ये वाढ व्हावे तसेच अभ्यासाबरोबर तांत्रिक व प्रात्यक्षिक ज्ञान अवगत व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे सर्व नियोजन प्राचार्य बी.एस.ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजक प्रा. संतोष बोडके यांच्यासह प्रा. मिनल सौंदते,प्रा.मनिषा यादव, प्रा.आश्विनी बुरसे, प्रा. धनश्री लोहार, प्रा. शकिरा शेख, प्रा. प्रणाली गुळंबे, प्रा. श्रध्दा नंदाई, प्रा. अलोकिता शिंदे, प्रा.आश्विनी गावडे, प्रा. विद्या पाटील व विद्यार्थ्यांनी केले आहे.