“आनंदाची बातमी” शिरोळ येथे साखर-पेढे वाटून,फटाके फोडून आनंदोत्सव साजरा

Spread the love

शिरोळ येथे साखर -पेढे वाटून , फटाके फोडून आनंदोत्सव साजरा

वृत्तपत्र विक्रेता व पत्रकारांचे स्वतंत्र महामंडळाच्या शासन निर्णयाचे जल्लोषात स्वागत

शिरोळ / प्रतिनिधी

येथील छत्रपती शिवाजी चौकात शुक्रवारी शिरोळ तालुका वृत्तपत्र विक्रेता – एजंट संघ तसेच शिरोळ तालुक्यातील सर्व पत्रकार यांच्यावतीने नागरिकांना साखर – पेढे वाटून तसेच फटाके फोडून महामंडळ निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
यावेळी तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सचिव धनंजय सावंत यांनी स्वागत केले. तालुकाध्यक्ष रायाप्पा बाळीग्रे , उपाध्यक्ष नागेश गायकवाड , खजिनदार चिदानंद कांबळे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार डॉ दगडू माने , सागर बाणदार यांची भाषणे झाली. शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात वृत्तपत्र विक्रेता व पत्रकारांसाठी स्वतंत्र दोन महामंडळाला मान्यता मिळाली. या निर्णयाचे स्वागत आहे . मात्र या महामंडळामध्ये अहोरात्र परिश्रम घेऊन वृत्तपत्र सेवेत काम करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेता , एजंट आणि पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात याव्यात.जेणेकरून त्यांचा सन्मान होऊन त्यांना श्रमाचे मोल मिळाले पाहिजे. अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली
यावेळी पत्रकार महेश पवार,अविनाश सूर्यवंशी , कृष्णात हेगाना,दादासो कांबळे,राजेंद्र प्रधान , बाळासाहेब कांबळेआदी उपस्थित होते. वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कलया जंगम यांनी आभार मानले.

error: Content is protected !!