इचलकरंजी शहरामध्ये गोवा बनावटीची दारू राजरोसपणे मिळत आहे.पण गेल्या दोन वर्षापासून राज्य उत्पादन शुल्कची कारवाई झाली नव्हती पण आज राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना खबऱ्याद्वारे गोव्याहून चेतन कलाल हा राजरोसपणे आपल्या स्विफ्ट कार मधून गोवा बनावटीची दारू आणून विकत असल्याची माहिती मिळाली होती.त्यांनी गेल्या दोन दिवसापासून कलाल याच्यावर नजर ठेवली होती.आज शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळी चेतन कलाल हा गोव्याहून गाडीतून बेकादेशीरपणे गोवा बनवण्याची दारू घेऊन येत होता.त्याला पंचगंगा साखर कारखाना-यड्राव रोडवर असलेल्या हॉटेल अंबरीश हॉटेल जवळ थांबवले असता गाडीमध्ये तपासणी केल्यास गोवा बनावटीची ब्रॅण्डच्या 2 लिटरच्या 14 आणि 750 मिलीच्या 32 बाटल्या आणि एक मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.कारवाईत एकूण 7 लाख 71 हजार 355 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.गोव्याहून इतकी दारू भरून गाडी गोवा महाराष्ट्र राज्यात पास करून कसे काय येऊ शकते गोवा चेक पोस्ट आजरा चेक पोस्ट व कोल्हापूरसह इचलकरंजी शहरामध्ये राजरोसपणे गाडी भरून दारू येती कशी काय पोलिसांचे याकडे लक्ष नाही का असा सवाल आता निर्माण झाला आहे.हि कारवाई आयुक्त विजया सूर्यवंशी प्रसाद सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.यावेळी राज्य उत्पादन शुल्कचे कोल्हापूर विभागाच्या स्नेहलता नरवने, इचलकरंजी राज्य उत्पादन पोलीस निरीक्षक शुल्क ए एस कोळी,एस वाय इनामदार,अजित भोंगाळे, सुभाष कोल्हे, वैभव शिंदे, मुकेश माळगे, सिद्धांत शेटे, आदित्य कोळी यांनी कारवाई केली.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे या कारवाईमुळे बेकादेशीर दारू विकणाऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे.