कुंभोज प्रतिनिधी / विनोद शिंगे
हातकणंगले विधानसभेचे आमदार माननीय राजू बाबा आवळे यांच्या फंडामधून अंबप येथील चिरेबंदी ओढा पुलाचे काम 1 कोटी 81 लाख, मातंग समाज अंतर्गत रस्ता पेविंग ब्लॉक 12 लाख ,महादेव मंदिर परिसर जंगम गल्ली सुशोभीकरण 12 लाख, पाटील गल्ली परिसर पेविंग ब्लॉक 12 लाख, आंबेडकर नगर येथील अंतर्गत डांबरीकरण 10 लाख, मसाई मंदिर कंपाउंड वॉल बांधणे 10 लाख, गणेश मंदिर कंपाउंड वॉल व सुशिकीकरण 10 लाख नाईक गल्ली चिबडे गल्ली ,निलजे गल्ली, हिरवे गल्ली, अंतर्गत पेविंग ब्लॉक 10 लाख, मातंग समाज स्मशानभूमीकरण 10 लाख ,वाघमोडे गल्ली, अनिल डोंगरे ते सावंत बोळ ,नाटकर रस्ता, डोंगरे गल्ली स्टँड रोड परिसर अंतर्गत रस्ता पेव्हिग ब्लॉक 10 लाख, माळी मळा अंतर्गत रस्ता डांबरीकरण 7 लाख ,धनगर समाज स्मशानभूमीकरण 7लाख, पाच हायमस्ट 6 लाख, पाटील घेवारी पाणंद 5 लाख ,थोरात गल्ली पेविंग ब्लॉक बसवणे 3 लाख, लाळगे गल्ली पेव्हींग ब्लॉक बसवणे 3 लाख इत्यादी 3 कोटी 3 लाख रुपयांच्या विविध विकास कामाचा उद्घाटन समारंभ व लोकार्पण सोहळा मा.आमदार राजू बाबा आवळे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.यावेळी श्री बापूसाहेब यशवंत पाटील सहकार समूहाचे अध्यक्ष अँड. राजवर्धन पाटील साहेब अंबप गावचे माजी सरपंच डॉक्टर बी.के. पाटील तसेच धनगर समाज, बौद्ध समाज, मातंग समाज, चर्मकार समाज, जंगम समाज, मुस्लिम समाज इत्यादी सर्व समाजातील नागरिक ,काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.