हरियाणा येथील विजयानंतर वडगाव येथे भाजपचा आनंदोत्सव

Spread the love

कुंभोज प्रतिनिधी / विनोद शिंगे

हरियाणा मध्ये सलग तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टी ची एक हाती सत्ता स्थापन झाली यानिमित्त भारतीय जनता पार्टी हातकणंगले तालुका चे अध्यक्ष मा.अमरसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेठ वडगाव येथे आताष बाजी करत व साखर पेढे वाटप करण्यात आले,यावेळी वडगाव नगरपालिका चौक विजयाच्या घोषणांनी दणाणून सोडला या आनंदोत्सव साजरा करणे साठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते तसेच येणाऱ्या आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची भाजप सरकार सत्ता संपादन करेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!