आगामी विधानसभा निवडणुकीत मला साथ द्या – आमदार राजु बाबा आवळे

Spread the love

आगामी विधानसभा निवडणुकीत मला साथ द्या-आमदार राजु बाबा आवळे

कुंभोज प्रतिनिधी  / विनोद शिंगे

संवाद दौऱ्यानिमित्त शिरोली येथे हातकणंगले विधानसभा आमदार राजू बाबा आवळे यांनी भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी गावकऱ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. व आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला विजयी करणेचे आव्हान केले.
दयावान मंडळाचा वतीने त्यांचे स्वागत करून सत्कार केला.यावेळी आमदार आवळे यांनी मंडळाचे कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगितले मंडळाचे आभार मानत नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच गावोगावी मिळणार नागरिकांचे आणि महिला भगिनीचं प्रेम काम करण्यासाठी उर्जा देते याची प्रचिती आली असल्याचे सांगितले.आगामी काळात आपल्याला सगळ्यांना विकासाच्या माध्यमातून गावचा विकास करायचा आहे. त्यासाठी तुमच्या सर्वांची साथ मला हवी आहे.असे आव्हान हि त्यांनी केले.

error: Content is protected !!