कुरुंदवाड / प्रतिनिधी
कुरुंदवाड येथे तंबाखू मिश्रित मावा तयार करून विक्री करणाऱ्या पान टपरीवर जिल्हा गुन्हे अन्वेषण आणि कुरुंदवाड पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेत १२ हजार २७० चा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी शेखर गणेश रजपूत (वय.२६,रा.कुरुंदवाड), अनिकेत दिपक कोळी (वय.२५,रा.शिरोळ,ता.शिरोळ),इस्माईल मोहम्मद मुल्ला (वय.४३,रा.कुरुंदवाड)यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयीत आरोपी राजपूत हा मजरेवाडी रस्त्यावर दोस्ती पान शॉपी नावाने असलेल्या पान टपरीत बारीक सुपारी,सुगंधित तंबाखू चुन्याचे मिश्रण करून मावा नामक पदार्थ विक्री करत असताना रंगेहात मिळून आला.त्याच्याकडून ४० पुड्या मावा, सुपारी सुगंधित तंबाखू रोख रक्कम असा दीड हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.रस्त्यावरील ओम पान शाप या पान टपरी मध्ये संशयित आरोपी कोळी हा सुपारी, सुगंधीत तंबाखू,चुना मिश्रण तयार करून विक्री करत असताना मिळून आला त्याच्याकडून पोलिसांनी दीड हजार रुपयाचा तर इस्माईल मुल्ला हा नवबाग रस्त्यावरील एका टपरीत बसून माव्याच्या पुड्या विक्री करत असताना रंग हात मिळून आला त्याच्याकडून ६ हजार ५२० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तर तीनही ठिकाणाहून ३ हजार रुपयाची सुपारी आणि सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस हेडकॉन्स्टेबल सागर खाडे, मुबारक विजापुरे आणि जिल्हा गुन्हे अन्वेषणचे सागर माने यांनी केली.