हातकणंगले / सुकुमार अब्दागिरे
माणगाव ता. हातकणंगले येथे वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने नवरात्रोत्सवानिमित्त शारदीय महिलांसाठी खास होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक वारणा उद्योग समूहाचे प्रमुख, आमदार डॉ.विनयराव कोरे (सावकर) यांच्या हस्ते, हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्य मगही पक्षाचे प्रमुख दलितमित्र डॉ. अशोकराव माने, माणगांवचे सरपंच राजू मगदूम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.जवाहरचे संचालक जिनगौंडा पाटील काका याच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना महिन्याला १५०० रुपये मंजूर केल्याबद्दल महिला भगिनीनी शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमदार विनय कोरे, दलितमित्र अशोकराव माने यांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील, अशोक पाटील, उद्योगपती धनंजय टारे, सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन अनिलराव कांबळे, भाजप अल्पसंख्याक आघाडीचे सलीम मुलांनी, टस्टचे अध्यक्ष, पदाधिकारी व महिला भगिनी उपस्थित होत्या.