दुर्गा माता दौड म्हणजे शिवरायांच्या अपार पराक्रमाची गाथा आणि झोपलेल्या हिंदू खडबडून जागे करण्याची धमक म्हणजे दुर्गा माता दौंड
श्री शिवप्रतिष्ठाणच्या दुर्गा दौडमुळे पुलाची शिरोलीतील वातावरण भक्तीमय
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
दुर्गा माता दौड या शब्दातच या शब्दाची ताकद आणि सारा अर्थ सामावलेला आहे पृथ्वीतलावर जेव्हा संकट येते जेव्हा म्लेंच्छाची गर्दी होते. तेव्हा आई जगदंबा दुर्गेचा अवतार घेते.
पुलाची शिरोली येथील श्री.शिवप्रतिष्ठाण यांच्या वतीने घटस्थापने पासून विजयादशमी पर्यंत गावातून पहाटे दुर्गा दौड काढुन जनजागृती करण्यात येत आहे.या दुर्गा दौडतील ध्वजाचे प्रत्येक घरोघर पुजन करुन स्वागत केले जात आहे.गेल्या काही वर्षापासून संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या प्रेरणेतून गेली ३२ वर्ष श्री शिवप्रतिष्ठाण पुलाची शिरोली यांच्या वतीने घटस्थापनेपासुन ते विजयादशमीपर्यंत दररोज पहाटे दुर्गा दौड काढण्यात येते.
आज गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 वाजता पुलाची शिरोली विठ्ठल मंदिर येथे एकत्र येत
ग्रामपंचायत प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महारांजांच्या स्मृर्तीला अभिषेक करून पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करुन धेय्य मंत्र व प्रेरणा घेऊन मारुती मंदिरात आशीर्वाद घेऊन डोक्यावर पांढरी टोपी,भगवे फेटे असतात संपूर्ण गावातून हे मावळे अनवाणी या दौडमध्ये सहभागी होतात.
जय भवानी….जय शिवाजी…दुर्गा माता की जय….,काली माता की जय…,छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय ,बजरंग बली की जय,भारत माता की जय,हिंदू धर्म की जय…अशा गर्जनेत निघालेल्या या दौडीत मध्ये भगवा ध्वजाचा रक्षणासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या बाजी प्रभू,तानाजी मालुसरे,फइरंगओजई नरसाळे, मुरारबाजी , प्रतापराव गुज्जर,शिवा काशीद
यांच्यासारख्या वीरांचा जयघोष करत प्रत्येक मावळा अभिमानाने छाती फुलवत आजचा हिंदू धर्माच्या वारसांना डोळ्यात अंजन घालवत होता.या दौडीच्या अग्रभागी हिंदुराष्ट्र भगवा ध्वज असतो. त्यांनतर श्री भवानी मातेची तलवार घेऊन शिवप्रतिष्ठाण सर्व मावळे दोन रांगेत सर्व मावळे शिस्तीचे काटेकोरपणे पालन करत
मार्गक्रमण करतात.दुर्गा दौड दरम्यान जागो हिंदु जागो भारत हिंदुस्तान है हिंदू ओंकी शान है अशी वेगवेगळी श्लोक म्हणत एक मावळा पुढे म्हणतो त्या पाठोपाठ सर्व मावळे गातात.ग्रामस्थ व महीला वर्ग मोठ्या आनंदाने या दुर्गा दौडीच्या स्वागतासाठी सज्ज असतात घरासमोर
सडा रांगोळी काढली जात आहे.दौड घरासमोर आल्यावर महीला भक्तीभावाने भगव्या ध्वजाची पुजा करतात.या दौडमध्ये सुमारे च्यारशे ते पचशे पेक्षा जास्त मावळे सहभागी होतात.नऊ दिवस दररोज गावातील प्रत्येक भागात दौड निघते या दुर्गा दौड चा ग्रामपंचायत प्रांगणात
समारोप होतो.तेथे प्रेरणा मंत्र व धेय्य मंत्र होते त्यानंतर सर्वांना प्रसाद वाटप होते.या दौडमध्ये चार-पाच वर्षापासुन ते पन्नास साठ वयोगटातील लोकांचा सहभाग असतो.विजया दशमीच्या दिवशी या दौडमध्ये महीला व तरुणी ही मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.या दौडमुळे नऊ दिवस गावातील वातावरण भक्तीमय होते.
पुन्हा शिवाजी जन्माला यावं असं प्रत्येकाला वाटत असेल तर हिंदू धर्म रक्षण करणे गरजेचे आहे.इतिहासाला शिवराय अजूनही जिवंत आहे आणि सूर्य चंद्र सोबती ते जिवंतच राहील आणि तो आजच्या तरुण,बाल,वृद्ध तिन्ही पिढ्यांच्या नसा-नसात आपल्याला पोहोचवायचा आहे.याच शक्तीवर आज संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात दुर्गा
माता दौडीचे आयोजन केले जाते.या दौडीस शिरोली एम आय डीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रतिष्ठान शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून ही दौड काढत आहेत. तसेच शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून या दौडीसाठी चोक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.