शिरटी ग्रामस्थांनी साजरा केला झाडाचा १२ वा वाढदिवस

Spread the love
२ ऑक्टोबर २०१२ रोजी लावलेल्या वृक्षाचा १२ वा वाढदिवस शिरटी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.शिरटी येथील चावडी कट्टा ग्रुपच्या वतीने १२ वर्षांपूर्वी म्हणजे २ ऑक्टोंबर २०१२ रोजी चौकातील पारकट्ट्यावर कै.जिनगोडा पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या बारा वर्षांपासून ग्रुपच्या सदस्यांनी तसेच ग्रामस्थांनी या वृक्षाचे संवर्धन केले.गांधी जयंती दिवशी या झाडाचा १२ वा वाढदिवस आज 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी आठ वाजता अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.झाडाला फुले बांधण्यात आले परिसरात रांगोळी रेखाटन करण्यात आली. झाडाच्या भोवती मेणबत्त्या लावण्यात आल्या तसेच फुलांच्या माळा ही लावण्यात आल्या होत्या.महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नागरिक खानगोडा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.रामगोडा पाटील यांच्या हस्ते केक कापून झाडाचा वाढदिवस साजरा करण्यात आला, यावेळी अण्णासो मगदूम,पिंटू आरवाडे,नितीन चौगुले,दादा गतारे,कुबेर पाटील,रफिक रांगोळे, अमर खोबरे,राहुल ढेकळे,गुडु मुल्लाणी,संदीप ढेकळे,सुरज रांगोळे,सुशांत कोरवी,अभी होरे,शितल उदगावे,प्रमोद चव्हाण,सचिन कोकणे,मनोज कांबळे,बाळु मुल्लाणी,पार्थ ढेकळे,शरद चौगुले,महेश हत्ती,यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते.यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!