पु.शिरोली ग्रामपंचायतीत महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली ग्रामपंचायत मधील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सौ पद्मजा कृष्णात करपे या होत्या.यावेळी लोकनियुक्त सरपंच व सर्व महिला सदस्या यांनी प्रतिमेचे पूजन केले.
महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला.लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस मा.उपसरपंच अविनाश कोळी व ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव यांनी पुष्पहार अर्पण केला.तसेच श्रीफळ सदस्य महंमद महात यांनी वाढविले यावेळी लोकनियुक्त सरपंच यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत आपण गावात स्वच्छता केली.स्वच्छता ही सेवा असे म्हणून आपण कायमस्वरूपी स्वच्छता करावी. यावेळी उपसरपंच बाजीराव पाटील,शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांचा सत्कार मा.उपसरपंच कृष्णात करपे मा.उपसरपंच अविनाश कोळी सर्व ग्रामपंचायत सदस्य,सदस्या,तलाठी महेश सूर्यवंशी, तंटामुक्ती अध्यक्ष सतीश पाटील,संजय पाटील,प्रकाश कौंदाडे,राजाराम करपे,बाबासाहेब बुधले,ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी व गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी कार्यकर्ते उपस्थित होते.