घरावरती विज पडून इलेक्ट्रीक साहित्य।जळून खाक

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसात भगवान कृष्णा कांबळे रा लक्ष्मी नगर नंदीवाले वसाहत रोड यांचे घरावरती विज पडून इलेक्ट्रीक साहित्याचे

अंदाजे ५० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे .
शिरोळ शहराला सोमवारी रात्री पावसाने जोरदार तडाखा दिला असुन येथील भगवान कांबळे यांचे घरावरती विज पडून झालेल्या दुर्गघटनेत इलेक्ट्रीक सर्व्हीस वायर तुटलेली आहे , मिटर बंद पडलेले आहे . घरातील इलेक्ट्रिक फिटींग जळून गेले आहे . टी .व्ही . फॅन . कुलर जळाले आहे . याच भागातील अनिता कुंभार व चौगले यांच्याही घरातील इलेक्ट्रीक साहित्य जळाले आहे .
हि घटना सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास घटली असून सुदैवाने शिरोळ शहरात लाईट गेली असताना हि घटना घडली असल्याने मोठा अनर्थ टळला कांबळे व त्यांचे कुटूंबिय झोपले असताना हि घटना घडली . दरम्यान महावितरण विभागाने या भागाची पाहणी केली तसेच तलाठी कार्यालयाच्या वतीने पाहणी करून माहिती घेण्यात आली .

error: Content is protected !!