‘या’ ठिकाणी कंत्राटी पध्दतीने अशासकीय पहारेकरी पद भरती

Spread the love

कंत्राटी पध्दतीने अशासकीय पहारेकरी पद भरती

कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अखत्यारित असलेल्या महासैनिक दरबार हॉल व लॉन करिता तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने अशासकीय पहारेकरी पद भरण्यात

येणार असून इच्छुकांनी आपले अर्ज दि.८ ‍डिसेंबर पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे जमा करावेत,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल (निवृत्त) राहुल माने यांनी केले आहे.

अशासकीय पहारेकरी हे पद कंत्राटी पध्दतीने व अल्पशा मानधनावर आहे.माजी सैनिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे.तसेच इतर अटी,शर्ती व सविस्तर माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,कोल्हापूर

दूरध्वनी क्र. 0231-2665812 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!