सभासदांनी थकीत कर्ज भरून संस्थेस सहकार्य करावे – विराजसिंह यादव

Spread the love

कै दिनबंधू दिनकररावजी यादव विकास सेवा संस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत

शिरोळ / प्रतिनिधी

 

आपली कै.दिनबंधू दिनकररावजी यादव विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था ही अपात्र कर्जमाफी आणि थकीत कर्जामुळे अडचणीत आली आहे . यामुळे सर्व सभासदांनी आपली थकीत कर्ज भरून संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे व्हाईस चेअरमन व युवा नेते विराजसिंह यादव यांनी संस्थेच्या वार्षिक सभेत बोलताना केले.

 

येथील कै. दिनबंधू दिनकररावजी यादव विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थेची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन डी बी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि संस्थापक संचालक अनिलराव यादव यांच्या उपस्थितीत संस्थेच्या कार्यालयात खेळीमेळीत पार पडली.

 

 

पारंभी कै. दिनकररावजी यादव यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित संचालक मंडळाचे हस्ते करण्यात आले अहवाल सालातील दिवंगताना श्रद्धांजली वाहण्यात आली.संस्थेचे व्हाईस चेअरमन विराजसिंह यादव स्वागत व प्रास्ताविक करताना म्हणाले की गेल्या 31 वर्षात संस्थेने सभासदांचे हिताचा कारभार केला आहे मात्र अपात्र कर्जमाफी व थकीत कर्जामुळे संस्था अडचणीत आली आहे यामुळे संस्थेतील थकीत कर्ज सभासदांनी भरून संस्था पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करूयात असे आवाहन शेवटी त्यांनी बोलताना केले संस्थेचे संचालक शिवाजी उर्फ बापू चव्हाण यांनी शक्तिपीठ महामार्गास विरोध करण्याचा ठराव माडला हा ठराव

 

 

सर्वानुमते मंजूर करण्यात आला तसेच संस्थेचे सचिव राजेंद्र यादव यांनी विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन केले सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली
संस्थेचे सभासद अजय पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना काही सूचना मांडल्या संस्थेचे चेअरमन डी बी चव्हाण यांनी संस्था पूर्वपदावर आणण्यासाठी सभासदांनी सहकार्य करून सभासदांचे हित जोपासूया असे आवाहन केले.

 

 

 

यावेळी संस्थेच्या संचालक दत्तात्रय काळे, आयजाक भोरे, मोहन पाटील, दत्तात्रय पुजारी, मन्सूर शेख, बजरंग संकपाळ, प्रल्हाद पाटील यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन संस्थेचे चेअरमन डी बी चव्हाण यांनी केले.

error: Content is protected !!