अल्पवयीन मुलीला शाळेत येता जाता वाटेत आडवून त्रास देणाऱ्यांची मोटरसायकल मुलीच्या भावाने घरी नेवून लावलेच्या कारणावरून संभापूर येथे मारहाण दोघे जखमी , ३० लोकांवर गुन्हा दाखल
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
अल्पवयीन मुलीला शाळेत येता जाता मोटरसायकल आडवी मारून मुलीस वाटेत अडवून तु मला खुप आवडतेस, मी रोज तुला पाहतोय, तु मला मेसेज कर, मेसेज नाही केलीस, तर तुझ्या भावाला मी काय पण सांगणार असे म्हणार्याना मुलीच्या भावाने याबाबत विचारणा केल्यावर आरोपीनी मोटरसायकल वाटेतच सोडून गेला मोटरसायकल मुलीच्या भावाने घरी आणून लावल्याने ३० जणांच्या जमावाने काठया, गज, कुराड व विळयासारखे लोखंडी हत्यार घेऊन मुलीच्या घरावर हल्ला केल्याने दोघेजण जखमी झाले याबाबतची फिर्याद साधना प्रकाश भोसले यानी शिरोली पोलिसात दिली आहे . हि घटना सोमवारी रात्री ९ वाजण्यासुमार संभापूर ता हातकणंगले येथे घडली असून पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार आकाश संभाजी आणुसे, अर्जुन भगवान कारंडे हे अल्पवयीन मुलीस एकटी शाळेत येता जाता पाहून तीच्या समोर मोटरसायकल आडवी मारून तीला वाटेत अडवून तु मला खुप आवडतेस, मी रोज तुला पाहतोय, तु मला मेसेज कर, मेसेज नाही केलीस, तर तुझ्या भावाला मी काय पण सांगणार असे म्हणून आरोपी आकाश आणुसे व अर्जुन कारंडे हे निघून गेले व त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा दोघांनी मोटरसायकलवरुन येवून मुलगी शाळेला एकटी जात असताना पाहून तिच्या समोर मोटरसायकल आडवी मारुन तीला थांबवून आकाश आणुसे याने “तु मला लई आवडतेस, तु मला मेसेज कर”, असे म्हटल्यावर मुलीने “मी माझ्या भावाला नाव सांगणार, मी मेसेज करणार नाही”, असे म्हटल्यावर आकाश आणुसे याने मुलीस “तु तुझ्या भावाला सांग, नाहीतर कोणालापण सांग, मी भित नाही” असे म्हणत आकाश आणुसे व अर्जुन कारंडे
दोघे ही मोटर सायकलवरुन निघून गेले.
मुलीच्या भावाने याबाबत आकाश आणुसे व अर्जुन कारंडे यांच्याकडे विचारणा करत असताना त्यानी मोटरसायकल रोडवर सोडून निघून गेले. मुलीच्या भावाने त्यांची मोटरसायकल घरात आणून लावली म्हणून १. आकाश संभाजी आणुसे, २. अर्जुन भगवान कारंडे ३. प्रकाश संभाजी आणुसे, ४. सुजय संजय कारंडे, ५. काशिनाथ कारंडे, ६. राज कटटमन्त्री [माने], ७. रोहित जगन्नाथ कारंडे, ८. किरण रावसाहेब आणुसे ९. अमोल रावसाहेब आणुसे १०. शुभम विष्णु डांगे, ११. कुलदिप भारत कारंडे, १२. सुरज भारत कारंडे, १३. अक्षय अशोक कारंडे, १४. गौरव नामदेव कारंडे, १५ राजवर्धन संदिप बंडगर, १६ अंकुश शामराव कारंडे, १७ सुरज परमेश्वर थोरात, १८. अविनाश आकाराम कारंडे, १९. उदय वाकसे सर्व रा. संभापूर व इतर ८ ते १० अनोळखी लोकांनी हातामध्ये काठया, गज, कुराड व विळयासारखे लोखंडी हत्यार घेऊन फिर्यादीचे घरामध्ये घुसून मुलीला व तीच्या भावाला सोडणार नाही असा दम देत यश प्रकाश भोसले ( वय १७ ) व तानाजी बबन भोसले याना शिवीगाळ करत मारहाण केली तर फिर्यादी यांच्या सासु, दिर यांना ढकलून दिले व घरावर दगडफेक करून खिडकीचे काचा फोडून नुकसान केले वाद सोडविण्यासाठी आलेल्या लोकांनाही मारुन गंभीर जखमी केले