पैशाच्या कारणातून युवकावर धारदार शास्त्राने वार

Spread the love

पैशाच्या कारणातून सुरू असलेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी एका युवकावर धारदार शास्त्राने वार करून जखमी केले.शिवम दिलीप हलवाई वय 17 रा.कुरूंदवाड असे जखमीचे युवकाचे नाव असून पवन दत्तात्रय काळे,जुनेद ऊर्फ अमन झांजे(दोघे रा.कुरुंदवाड)या दोघाविरुद्ध कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरुंदवाड पोलिसातून मिळाली.जखमी शिवम हलवाई याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,रविवारी सायंकाळी सव्वा सात वाजता शिवम हा दुचाकीत पेट्रोल टाकण्यासाठी टारे पेट्रोल पंपावर गेला होता.तो घराकडे परत येत असताना तो मोबाईल वर बोलत येत होता. संशयित आरोपी काळे आणि झांजे हे पाठीमागुन दु-चाकी गाडीवरुन येऊन गाडी आडवी मारून हलवाईला शिवीगीळी करुन तू कोणाला फोन लावला आहेस असा जाब विचारून मारण्याची धमकी दिली.हलवाई याच्याशी झांजे याचा पैशांवरुन असलेला जुन्या भांडणाचा राग मनात धरुन हातातील कोणत्यातरी धारदार शास्त्राने पाठीत वार करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.अधिक तपास कुरुंदवाड पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!