औरवाड ता.शिरोळ येथे कत्तलीसाठी कोंडून ठेवलेल्या चार गायींची कुरुंदवाड पोलिसांनी केली सुटका करत पांजर-पोळ कोल्हापूरमध्ये सोडल्या आहेत.ओंकार संजय केटकाळे रा.कवठेगुलंद ता.शिरोळ याने याबाबत कुरुंदवाड पोलिसात फिर्याद दिल्याने गायींची मुक्तता झाल्याने 3 गायींचा जिव बचावला आहे.याप्रकरणी बादशाह बेपारी रा.औरवाड यांच्याविरुद्ध कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. कुरुंदवाड पोलिसातून मिळाली.औरवाड येथे बेपारी याच्या मालकीच्या गोडाऊनमध्ये 3 खिलार जातीच्या तर 1 गिर जातीची अशा एकूण 68 हजार रुपये किमतीच्या 4 गायी कोंडून ठेवल्याची माहिती ओंकार केटकाळे याला लागताच त्याने तात्काळ कुरुंदवाड पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. उपनिरीक्षक सागर पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष साबळे,शिरीष कांबळे, सागर खाडे यांच्यासह गोडाऊनवर छापा टाकून 4 गायी ताब्यात घेऊन पांजर-पोळ कोल्हापूरला सोडल्या व संशयित आरोपी बेपारी याच्यावर गुन्हा दाखल केला.