इचलकरंजी / प्रतिनिधी
इंजिनिअर्स डे निमित्त इचलकरंजी येथील असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स & अर्किटेक्ट्स, जे के सिमेंट व सर्वेश सिमेंट शॉपी इचलकरंजी. यांच्यावतीने सन २०२४ चे सर्वश्रेष्ठ अभियंता पुरस्कार सोहळा येथील राधे बैंक्वेट हॉल येथे उत्साहात संपन्न झाला.
असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र खंडेराजुरी यांनी स्वागत केले.दीपप्रज्वलन व भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतीमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात झाली.
असोसिएशनच्यावतीने जे के. सिमेंटचे.मुकुंद देशपांडे, महेश बेंद्रे, दयानिधी कलाल,सागर तलवार राजेश देशपांडे व जे के. सिमेंट चे वितरक सर्वेश सिमेंट शॉपीचे मालक पन्नालाल डाळ्या यांचा सत्कार करण्यात आला. जे. के. सिमेंट च्यावतीने असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र खंडेराजुरी सचिव विकास नाईक, खजिनदार नितीन शेट्टी, सहसचिव भारत केटकाळे यांचा सत्कार करणेत आला.
इंजिनिअर महेश चौगुले यांनी शाश्वत विकास व ए. आय. तंत्रज्ञानचा बांधकाम क्षेत्रामधील वापर या बद्दल माहिती दिली.जे के. कंपनी सिमेंट कंपनीचे स्टेट हेड महेश बेंद्रे यांनी कंपनी बद्दल व नवीन लोगो बाबत तसेच बाजारातील वाढती सिमेंटची मागणी पूर्ण करणेसाठी कंपनीच्या विस्तारा बाबत माहिती दिली.
बांधकाम क्षेत्रामधील कोल्हापूर मधील अनुभवी इंजिनिअर रंगराव पाटील यांनी आपल्या अनुभवातून इंजिनिअर यांनी तयार केलेल्या डीझाइन प्रमाणे जागेवर काम पूर्ण करणेसाठी कोणकोणते घटक महत्वपूर्ण आहेत या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जे के सिमेंटचे झोनल हेड राजेश देशपांडे यांनी रंगराव पाटील यांचा सत्कार केला.सर्वश्रेष्ठ अभियंता पुरस्कार बाबत सर्वेश सिमेंट शॉपी चे मालक मा.पत्रालाल डाळ्या यांनी सविस्तर माहिती व उद्देश जाहीर केला.सन २०२४ या वर्षी हा पुरस्कार शिवप्रसाद ओझा, रमेश मर्दा, रविकांत भागवत अरुण भंडारे. यांना हा पुरस्कार प्रदान करणेत आला . या प्रसंगी असोसिएशनचे संचालक सचिन बोरा, विठ्ठल तोडकर, गिरीश माकाशी, सुहास रूगे, प्रकाश मालवीय रवींद्र तोरस्कर, आशिया पटेल, तन्वी कुलकर्णी, विवेक सावंत व असोसिएशनचे माजी अध्यक्ष व सभासद उपस्थित होते. आभार प्रदर्शन सचिव विकास नाईक यांनी, केले. सूत्रसंचालन जीवन घाटगे व वीरेन लखमानी यांनी केले.