सार्वजनिक बांधकाम विरोधात कुंभोज ग्रामस्थांचा रस्ता रोको

Spread the love


कुंभोज – विनोद शिंगे

कुंभोज-नरंदे रस्त्यावरील लेंडुरी ओढ्यावरील पुलाचे रुंदीकरण व संरक्षक कठडे बसवावेत,या मागणीचे निवेदन कुंभोज ग्रामपंचायती कडून वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाला

देऊन ही सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.यावेळी घोषणांनी परिसर दणाणून

सोडण्यात आला.घटनास्थळी हातकणंगलेचे पोलिस निरीक्षक महादेव तोंदले,गोपनिय विभागाचे संग्राम पाटील व सार्वजनिक बांधकामचे शाखा अभियंता प्रवीण मोरे यांनी भेट दिली.शाखा

अभियंता मोरे यांनी पुलाच्या रुंदीकरणाबाबत डिसेंबर २०२३ च्या अर्थसंकल्पात काम सुचवले असून मंजुरी प्राप्त होताच काम सुरू होईल,असे पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

error: Content is protected !!