दानोळी / प्रतिनिधी
उदगाव (ता.शिरोळ) येथे चोर समजून दानोळीच्या युवकाला बेदम चोप देण्यात आलेल्या युवकाची व ग्रामस्थांची उदगावच्या ग्रामस्थांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.सध्या चोरांचे वातावरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आकाशामध्ये ड्रोन फिरणे,घरावर दगड पडणे, दार वाजवणे अशा प्रकारच्या घटनांमुळे नागरिकांच्या मध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.सर्व ग्रामपंचायतकडून अनोळखी व्यक्ती दिसल्यास त्याची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.यामुळे नागरिकांच्या मध्ये सतर्कता पाळी जात आहे.पण रात्री अपरात्री कामावर जाणारे अनेक युवक आहेत.अशा युवकांना घरी परतताना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.चार दिवसांपूर्वी उदगाव येथे घडलेल्या घटना अत्यंत निंदनीय झाली असल्याचे ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.जेवण करून घरी परतत असलेल्या युवकाला चोर समजून अमानुष मारहाण करण्यात आली होती.व याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला असल्याकारणाने त्या युवकाची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली होती.पण हा युवक चोर नसल्याची खातरजमा झाली.व गैरसमजुतीमुळे झालेल्या घटनेची उदगाव मधील ग्रामस्थांनी दिलगिरी व्यक्त केल्याने दानोळी ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.