दुर्दैवी घटना टोप येथे रोड रोलर अंगावरून जाऊन एकाचा जागीच मृत्यु

Spread the love

पुलाची शिरोली – कुबेर हंकारे

टोप येथे रोड रोलर अंगावरून गेल्याने तरूण जागीच ठार ही घटना आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास टोप हायस्कूल परिसरात घडली.पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार मल्लाप्पा

बसप्पा नाईक ( वय ४० रा.पाडळी खुर्द ता करवीर ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.टोप येथील हायस्कूल परिसरात आनंदा पोवार यांनी प्लाॅट पाडलेल्या रस्त्याच्या सपाटी करणाचे काम

चालू होते.अचानक रोड रोलरचा गिअर अडकल्याने रोड रोलर बंद पडला म्हणून मल्लाप्पा नाईक हे खाली उतरून रोड रोलरच्या इंजिनचे डोअर खोलून काय बिघाड झालाय हे पाहत
असताना अचानक रोड रोलर पुन्हा सुरू होऊन पुढे जात

असताना नाईक यांनी रोलर थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र रोलर त्याच्या अंगावरून गेल्याने नाईक हे जागीच ठार झाले. या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात रात्री उशिरा झाली आहे.

error: Content is protected !!