गणेशोत्सवात संत बाळूमामाच्या कार्याची प्रतिकृती करत कौंदांडे कुटुंबांने जपली भारतीय संस्कृती,रूढी व परंपरा

Spread the love

पुलाची शिरोली येथील प्रकाश कौंदांडे यांच्या कुटुंबीयांनी घरगुती गणपती समोर श्री संत बाळूमामा यांच्या आदमापुर व मेतके येथील हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे.ही प्रतिकृती साकारण्यापाठीमागे कौंदांडे कुटुंबीयांचा उद्देश हाच की आपले गाव व खेड्यामध्ये असणारी संस्कृती रूढी परंपरा व आपले संत त्यांनी केलेले कार्य आपली संस्कृती विसरत चाललेल्या पिढीला समजावे रूढी परंपरा समजाव्यात संतांनी समाजासाठी केलेल्या सतकार्याची माहिती मिळावी.या उद्देशाने व सासू-सासर्‍याच्या प्रेरणेने प्रियंका सागर कौंदाडे व श्वेता दिग्विजय कौंदांडे यांनी ही प्रतिकृती साकारली आहे.या देखाव्यामध्ये बाळूमामा आपल्या दैवी शक्तीच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडवताना बाळूमामा, बाळुमामाची झोपडी,त्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बिरोबा मंदिर,बाळूमामा चाकरी असलेल्या ठिकाणी ते जेवत असलेल्या ताटामध्ये महावीर दिसल्यामुळे ते ताट याचीही प्रतिकृती साकारली आहे.बाळूमामांची मेंढरे स्वयंपाक करणारी महिला अडाचे पाणी नेणारी महिला बैलगाडी भूत बाधा झालेल्या महिलेची प्रतिकृती साकारली आहे.सर्व देखावा तयार करीत असताना या दोघींना व घरातील लहान मुलांना आपली संस्कृती व संतांनी केलेल्या कार्याची माहिती मिळत होती. तसेच हा देखावा पाहण्यासाठी भागातील सर्व लोक येत आहेत या देखाव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!