“कौतुकास्पद” एन.सी.सी.कॅडेट सई काळेची राष्ट्रीय पातळीवर निवड

Spread the love
शिरोळ / प्रतिनिधी
56 महाराष्ट्र बटालियन कोल्हापूर NCC कॅडेट सई संतोष काळे हीची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय थल सैनिक (AITSC – ALL INDIA THAL SAINIK CAMP) या नॅशनल कॅम्प साठी निवड झाली आहे. कॅडेट सई ही महाराष्ट्र निदेशालयाकडून अखिल भारतीय नकाशा वाचन (MAP READING) स्पर्धेत भाग घेईल.
यापूर्वी श्री पद्माराजे विद्यालय शिरोळ येथे बेस्ट कॅडेट तसेच गेली 3 महिने ती NCC भवन कोल्हापूर येथे आयोजित कॅम्प मधील परीक्षेत सिल्वर मेडल तसेच मैदानी व लेखी परीक्षेत प्रथम क्रमांकाने यश संपादन केलेने तिची या राष्ट्रीय  कॅम्प साठी निवड झाली आहे.
ती जयसिंगपूर महाविद्यालयाची  विद्यार्थिनी असून तिला 56 महाराष्ट्र बटालियन कोल्हापूरचे कमांडींग ऑफिसर पुनीत गोगीया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.ए.मांजरे, लेफ्टनंट एस.एस.पाटील पद्माराजे विद्यालयाचे आनंद पुजारी सर तसेच शिरोळ चे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.तिच्या निवडीबद्दल महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे  व सर्व  संस्था पदाधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य,सुपरवायझर, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी या सर्वांकडून अभिनंदन केले जात आहे.
error: Content is protected !!