इचलकरंजी शहराला केंद्र शासनाच्या पीएम ई-बस योजनेमध्ये इचलकरंजी शहराचा समावेश
शहरासाठी २५ इलेक्ट्रॉनिक बस मिळणार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नांना यश दरम्यान केंद्र शासनाच्या पीएम ई-बस योजनेअंतर्गत देशातील मोठ्या शहरांमध्ये इलेक्ट्रॉनिक बस
पुरवून प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.या योजनेमध्ये नव्याने स्थापन झालेल्या इचलकरंजी महानगरपालिकेचा समावेश व्हावा यासाठी
खासदार धैर्यशील माने यांनी पाठपुरावा केला होता.या पाठपुराव्याला यश आलेअसून महाराष्ट्र राज्यातील 23 23 शहरांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला असून यामध्ये इचलकरंजी शहराचा समावेश करण्यात आला असल्याचे
खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले.तसेच शहरामध्ये बस सेवा सुरू करण्यासाठी परिवहन डेपो इमारत व चार्जिंग स्टेशन साठी निधी मागणीसाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच प्रस्ताव तयार झाल्यानंतर
त्याची केंद्र शासनाकडून मंजुरी आणून इचलकरंजी शहरवासीयांसाठी प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक बस सुरू करणार असल्याचेही खासदार माने यांनी सांगितले.दरम्यान महावितरण कडे इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशनसाठी परवानगी मागितली
असल्याचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले.खासदार धैर्यशील माने यांच्या या प्रयत्नामुळे लवकरच इचलकरंजी इलेक्ट्रॉनिक बस सेवा सुरू होणार असल्यामुळे शहरामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.