जयसिंगपूर /प्रतिनिधी
जयसिंगपूर येथील नगरपालिका नोकर लोकांची सहकारी गृहनिर्माण संस्थेची 54 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी अनेक विषय सर्वानुमते मंजूर झाले. सेक्रेटरी अशोक पाटील यांनी विषयांचे वाचन केले.सर्वच उपस्थित सभासदांनी चर्चेत उत्स्फूर्तपणे भाग घेतला व आपआपली मते मांडली. चेअरमन संदीपराव जाधव यांनी अध्यक्षीय भाषणात सभासदांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देत शंका समाधान केले.यावेळी संस्थेचे सर्व संचालक व सभासद उपस्थित होते