लायन्स क्लब ऑफ शिरोळच्या पदाधिकाऱ्यांचा आज शपथविधी व पदग्रहण सोहळा

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

लायन्स क्लब ऑफ शिरोळ या सामाजिक संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी व पदग्रहण सोहळा आज रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता येथील अर्जुनवाड रस्त्यावरील टारे मंगल कार्यालय येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती लायन्स क्लब ऑफ शिरोळचे माजी अध्यक्ष सुनील देशमुख व झोन चेअरमन सचिन माळी यांनी दिली.

 

लायन्स क्लब ऑफ शिरोळचे नूतन अध्यक्ष बुधाजी चुडमुंगे, सचिव अमोल देशमुख, खजिनदार अभिजीत गुरव यांच्यासह बोर्ड ऑफ डायरेक्टर यांचा शपथविधी व पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल सुनील सुतार, समन्वयक विजय जमदग्नी, झोन चेअरमन राजेंद्र गवळी यांच्या हस्ते शपथविधी व पदग्रहण सोहळा होणार आहे.तसेच महिला महाराष्ट्र केसरी पै अमृता पुजारी आणि जलसंपदा विभागात मोजणीदारपदी निवड झालेल्या सबिहा मुसा शेख यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

 

या समारंभास माजी खासदार राजू शेट्टी,माजी आमदार उल्हास पाटील, श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख गणपतराव पाटील,दत्त कारखान्याचे संचालक अनिलराव यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य व दलित मित्र डॉ अशोकराव माने,माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव,आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजी चुडमुंगे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

यावेळी लायन्स क्लब ऑफ ऑफ शिरोळचे माजी सचिव भास्कर पाटील, सदस्य रामप्रसाद पाटील, किशोर पाटील रेंदाळकर,प्रवीण चौगुले,सनीसिंग पाटील,डॉ अशोक कोटगीरे, भालचंद्र सासणे, संदीप रायान्नावर, महेश मोरे, गजानन चव्हाण, सर्जेराव पाटील,अजीत गतारे,

 

प्रसन्न पाटील,डॉ विशाल चौगुले, डॉ सुशांत पाटील,डॉ रवी भोसले,डॉ राहुल खोत, अभिजीत माने,चंद्रशेखर पाटील, युवराज पाटील,राजेंद्र बांदिवडेकर, प्रल्हाद कुंभार, दिगंबर माने, सुरेश बागडी उपस्थित होते.

error: Content is protected !!