“राजकीय बातमी” तर मी शिरोळ विधानसभा लढवणार – गणपतराव पाटील

Spread the love

शिरोळ तालुक्याचे कॉग्रेसचे नेते व श्री दत्त साखर कारखाण्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी शिरोळ विधानसभा निवडणुकीसाठी कॉग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागणी केली आहे.दरम्यान गणपतराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली असून त्यांच्या भेटीने शिरोळ विधानसभा निवडणुकीसाठी गणपतराव पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.याबाबत आज बुधवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी शिरोळ येथे दत्त साखर कारखानास्थळी गणपतराव पाटील यांची भेट घेतली असता त्यांनी आपण कॉग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे आणि जर महाविकास आघाडीने उमेदवारी दिली तर आपण निवडणूक लढण्यास तयार असल्याचे सांगितले.मात्र शरद पवार यांची भेटीत केवळ शेती विषयावर चर्चा झाली आहे.

कोणतेही राजकिय चर्चा झाली नसल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!