तुटपुंज्या व्यवसायातही देशभक्ती जपली; 38 वर्षांपासून तो करतो राष्ट्रध्वजाची इस्त्री
शिरोळ /प्रतिनिधी
देशावर आपले प्रेम असेल तर जवान बनून सीमेवर जावे असे नाही; तर ती देशभक्ती आपल्या छोट्यातल्या छोट्या कामातूनही साध्य करता येऊ शकते.याचेच जिवंत उदाहरण म्हणजे शिरोळ येथील अनिल उर्फ श्रीकांत राजाराम बन्ने हे गेली 38 वर्षे शहरातील परिसरातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील तिरंगा ध्वज विना मोबदला इस्त्री करून देत आहेत.
अनिल बन्ने यांच्याया देशभक्तीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.अनिल बन्ने यांनी आतापर्यत राष्ट्रध्वज कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता स्वच्छ करून ईस्त्री करून दिले आहेत.इस्त्री व्यवसाय आधीच हा 10 रू 5 रुपये हे कपडे स्वच्छ व ईस्त्री करून जमवले जातात.परंतु अशा तुटपुंजा आणि अल्पशा पैशांवर हा व्यवसाय करताना देखील अशा पद्धतीने देशभक्ती दाखविणे खऱ्या अर्थाने देशभक्तांचे अनोखे उदाहरण म्हणावे लागेल.
परिसरातील नागरिकांना देखील अनिल बन्ने यांच्या कामाचा अभिमान वाटत असल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.शासनाच्या वतीने उद्यापासून हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यासाठी तीन दिवस शासकीय निमशासकीय कार्यालय सहकारी सेवा संस्था पतसंस्था बँका या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यासाठी लागणाऱ्या तिरंगा ध्वजाची इस्त्री करण्यासाठी जे अनिल बन्ने यांच्याकडे येतात त्या ध्वजाची ते विना मोबदला इस्त्री करीत आहेत