शिरोळ / प्रतिनिधी
येथील रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ, श्री दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळ,व कुमार केंद्रीय शाळा दत्तनगर कन्या शाळा दत्तनगर यांच्या संयुक्त विद्यमाने 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्यात राष्ट्राभिमान जागृत व्हावा याकरिता देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम उद्या शुक्रवारी आयोजित करण्यात आला आहे.
मौजे आगर येथील श्री पृथ्वीचंद माछरेकर निर्मित दि ग्रेट कराओके म्युझिक शो यांचा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे.सदर कार्यक्रम शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 या वेळेत येथील श्री दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळ सांस्कृतिक सभागृह दत्तनगर येथे होणार आहे.
या कार्यक्रमाचा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष तुकाराम पाटील (भैय्या),सचिव प्रा के एम भोसले, ट्रेझरर चंद्रकांत भाट, इव्हेंट चेअरमन विराजसिंह यादव, दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष एम व्ही पाटील, सचिव निलेश पाटील, केंद्रीय शाळा दत्तनगरचे मुख्याध्यापक नामदेव सन्नके, कन्या शाळा दत्तनगरच्या मुख्याध्यापिका सौ संगीता घोरपडे यांनी केले आहे.