नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात
शिरोळ / प्रतिनिधी
सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीचे उल्लेखनीय कार्य रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीच्या माध्यमातून नेहमीच होत आहे या संस्थेच्या सामाजिक कार्यास श्री दत्त उद्योग समूहाचे नेहमीच सहकार्य राहील असा विश्वास श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व सहकार महर्षी गणपतराव पाटील (दादा) यांनी व्यक्त केला
येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष तुकाराम पाटील (भैय्या) सचिव मेजर प्रा के एम भोसले खजिनदार व पत्रकार चंद्रकांत भाट या नूतन पदाधिकाऱ्यांचा श्री दत्त उद्योग समूहाच्यावतीने सहकारमहर्षी गणपतराव पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला यावेळी ते बोलत होते
या सत्कार सोहळ्याप्रसंगी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील ज्येष्ठ संचालक अनिलराव यादव दरगू माने- गावडे ॲड प्रमोद पाटील जयसिंगपूरचे माजी नगरसेवक उद्योगपती अशोकराव कोळेकर संजय पाटील कोथळीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते