शिरोळ / प्रतिनिधी
रोटरी क्लब ने शिरोळ परिसरात उत्कृष्ट काम केले आहे विविध उपक्रम राबवून समाजाभिमुख कार्य केले आहे त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो यापुढेही अधिक काम करण्यासाठी प्रयत्न करावा असे प्रतिपादन सांगली मिड टाऊन रोटरी क्लबचे मलिकार्जुन बड्डे यांनी केले.
शिरोळ येथील टारे सभागृहात रोटरी क्लब ऑफ शिरोळचा पदग्रहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी नूतन अध्यक्ष सुनील बागडी सेक्रेटरी डॉक्टर अंगराज माने खजानिस दिनेश माने-गावडे यांचा पदग्रहण झाला .यावेळी रोटरी चे असि टंट गर्व्हनर सागर आडगाणे प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी स्वागत मोहन माने यांनी तर प्रास्ताविक नितीन शेट्टी केले.मावळते अध्यक्ष आबा जाधव यांनी रोटरीच्या कार्याची माहिती दिली.यावेळी सबिहा मुसा शेख मोहन माने अशोक टारे यांचा विशेष सत्कार झाला.सूत्रसंचालन दीपक ढवळे यांनी केले.
कार्यक्रमास अविनाश टारे,अंजिक्य पाटील, तानाजी संकपाळ, बापूसो गंगधर, श्रीकांत शिरगुप्पे,अतुल टारे, शिवराज महात्मे, अमित पंडित, पंडित काळे, शरद चुडमुंगे, चिंतामणी गोंदकर, प्रवीण कनवाडे,बाळासो शेट्टी, रणजीत जगदाळे, संदीप बावचे,मुरलीधर कुंभार, तोफिक मुल्ला यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते डॉ.अंगराज माने यांनी आभार मानले.