विद्यार्थ्याच्या व्यक्तित्मव विकासात गुरूची भूमिका महत्तवाची – संचालिका कु. तृप्ती माने

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

रंगराव माने चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट इंग्लिश मिडीयम स्कूल शिरोळ या शाळेत गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त स्कूलच्या संचालिका कु. तृप्ती माने आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या गुरू बददल आदर, सन्मान, प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी जपणे गरजेचे असून तो आपल्या देहापर्यत पोहचवू शकतो त्यामुळे विद्यार्थ्याच्या व्यक्तित्मव विकासात गुरूची भूमिका फार महत्तवाची असते
संस्थेचे अध्यक्ष मोहन माने बोलताना म्हणाले की आपले आई वडील हे प्रथम गुरू आहेत त्याचा सन्मान व आदर केला पाहिजे त्याचप्रमाणे शिक्षक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे त्याच्यामुळेच आपण आयुषात यशस्वी होतो.

 

यावेळी शाळेतील सर्व गुरूजनांचा सत्कार करण्यात आला. संचालिका सौ. स्वाती माने, कु. पूजा माने, सतिश ढवळे, गजानन भोसले, पर्यवेक्षक सौ. शेहनाज शेख, सौ. ज्योति बरगाले सौ. मेघा ढेकळे व इतर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्कूलचे प्राचार्य प्रा.पी.एस. काकडे यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले.

error: Content is protected !!