महानगरपालिका हद्दवाढीच्या विरोधात शिरोली बंदला उस्फुर्त प्रतिसाद

Spread the love

कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढीला विरोध करण्यासाठी आज रविवार एक दिवस पुलाची शिरोली, नागाव,शिये गावातील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यवहार शंभर टक्के बंद ठेवण्यात आले.कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढीत हातकणंगले व करवीर तालुक्यातील सुमारे १९ गावांचा समावेश करण्यात आला आहे.

 

 

पण महानगरपालिका कोल्हापूर शहरात नागरीकांना अत्यावश्यक सेवा सुविधा देण्यात अपयशी ठरली आहे.फक्त महसूल गोळा करण्याच्या उद्देशाने हद्दवाढीचा घाट घातला जात असल्याचा आरोप पुलाची शिरोलीच्या सरपंच सौ.पद्मजा करपे यांनी केला आहे.तसेच ग्रामपंचायत फंडातून सर्व नागरी सेवा सुविधा देण्यास सक्षम असल्याचे ही सांगितले.

 

 

त्यामुळे या राक्षशी हद्दवाढीला विरोध करण्याचा निर्णय उचगाव येथील सर्व पक्षीय पदाधिकार्यांनी घेतला होता.

त्याअनुषंगाने रविवारी पुलाची शिरोली व नागाव शिंये गावबंद ठेवून हद्दवाढीला तिव्र विरोध दर्शवण्यात आला.

 

 

रविवारी संपूर्ण गावबंद मध्ये सहभागी झालेले नागरिक, व्यावसायिक,व्यापारी,लहान मोठे उद्योजक या सर्वांचे शिरोली सरपंच सौ.पद्मजा करपे व नागाव सरपंच सौ.विमल शिंदे यांनी आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!