शिरोळ येथील लक्ष्मण भाट यांचे निधन

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

येथील प्रतिष्ठित नागरिक लक्ष्मण गणू भाट यांचे वयाच्या 86 व्या वर्षी अल्पशा आजाराने शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी निधन झाले आहे.शिरोळमध्ये त्यांनी 60 वर्षे आपला पारंपारिक भाटकी (निमंत्रण देणे) या व्यवसायाबरोबर शेती करत भाट समाजाची व आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले.त्यांच्या या कार्यामुळे त्यांना समाजात आदराचे स्थान होते.सर्वत्र दादा अथवा राजं या नावानेच संबोधले जायचे सर्वांच्या सुख-दुःखात आणि बारशापासून बाराव्या पर्यंतच्या कार्यक्रमात एक कुटुंबातील घटक म्हणूनच सहभाग घेऊन प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे दादा अशी त्यांची ख्याती होती. तसेच एकत्र कुटुंब पद्धतीतील आदर्श कुटुंबप्रमुख म्हणून संपूर्ण समाज सन्मानाने त्यांच्याकडे पहात होता.त्यांच्या कार्याबद्दल रोटरी क्लब ऑफ शिरोळ यांनी व्होकेशनल सर्व्हिस अवॉर्ड आणि ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.अल्पशा आजाराने ते शुक्रवारी काळाच्या पडद्याआड गेले.यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.त्यांच्या अंत्यसंस्कार विधीवेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, भाऊ,भावजय,पुतणे,नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.रक्षाविसर्जन आज रविवार दिनांक 7 जुलै 2024 रोजी सकाळी नऊ वाजता शिरोळ येथील पंचगंगा नदी काठावरील जगदाळे वैकुंठधाम येथे होणार आहे.

error: Content is protected !!