सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूल या शाळेची मान्यता रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन,नागरी कृती समितीचा इशारा

Spread the love

सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूल या शाळेची मान्यता रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या वतीने इशारा

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

पुलाची शिरोली येथील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूल या शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी शिक्षण संचालकांकडे प्रस्ताव पाठवून दोन वर्षे झाली अजून शाळेची मान्यता रद्द झाली नाही , तर दोन वर्षात पोलीसानी शाळेवर कारवाई करणे गरजेचे होते पण असे न करता पोलिसांनी संशयास्पद भुमिका घेतली या शाळेची मान्यता रद्द न झाल्यास शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गिरीश फोंडे यानी पत्रकार परिषदेत दिला .

शिरोली पुलाची येथील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूल मध्ये नववीच्या वर्गात शिकत असलेल्या आर्यन हेरंब बुडकर या विद्यार्थ्याने १ एप्रिल २०२२ रोजी आपल्या राहत्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ही आत्महत्या शाळा संस्थाचालक गणपत पाटील व गीता पाटील यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या छळाला कंटाळून त्याने आत्महत्या केली . आर्यन सारख्या अल्पवयीन विद्यार्थ्याला हे असहनीय न झाल्याने त्याने . १ एप्रिल रोजी आत्महत्या केली त्या दिवशी देखील गणपत पाटील यांनी पुन्हा आर्यनला जाणीवपूर्वक मानसिक त्रास दिला.

गणपत पाटील व गीता पाटील यांनी अशा प्रकारे अनेक विद्यार्थ्यांना या पद्धतीने छळ केला आहे यामध्ये विद्यार्थ्यांना टॉयलेट साफ करायला लावण्यापासून ते फी न भरल्यामुळे वर्गाबाहेर काढण्यापर्यंत त्यांनी विद्यार्थ्यांचे शोषण केले आहे त्यामुळे शिक्षण वाचवा नागरिक कृती समिती व शिरोली ग्रामस्थांनी केलेले एकजुटीने आंदोलन करून प्रशासनाला योग्य कारवाईसाठी पावले उचलणे भाग पडले होते.

 

 

संस्थाचालकावर आत्महत्येस प्राप्त केले असा गुन्हा ही दाखल झाला अशा शाळेची मान्यता रद्द होण्यासाठी शिक्षण उपसंचालक यांनी या शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी ची शिफारस आपल्या अहवालातून शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे केली होती. पण काही महिन्यांनी शिक्षण संचालक पुणे यांनी शिक्षण सचिवांच्याकडे हा प्रस्ताव पुढे पाठवला. पण या प्रक्रियेची पूर्तता लवकरात लवकर होणे गरजेचे होते. पण शासकीय अधिकाऱ्यांनी आतापर्यंत यामध्ये चालढकल करण्याची भूमिका अवलंबली आहे.

 

 

सामान्य जनतेला जसा घर फळा लावला जातो तसा करा मध्ये या शाळेत का लावला गेला नाही असा सवाल ही उपस्थित होत आहे . जेव्हा शाळेवरती लोकशाही मार्गाने शांततेत मोर्चा काढण्याचे ग्रामस्थांनी ठरवले त्यावेळी पोलिसांनी दडपशाही करण्याचा प्रयत्न केला व चोर सोडून संन्यासालाच फाशी या न्यायाप्रमाणे आंदोलकांच्यावरच गुन्हे दाखल केले.

 

 

यावेळी संस्थाचालकाने बेकायदेशीरपणे आंदोलकांच्यावर पहारा ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरा वापरले. व योगायोगाने तो कॅमेरा खाली पडल्यामुळे आंदोलकांच्या लक्षात आले या ड्रोन ची कोणतीही परवानगी घेतलेली नसताना ड्रोन वापरला याबद्दल कार्यकर्ते व आर्यनच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्याकडे तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

 

 

याला देखील सुरुवातीला पोलिसांनी चालढकल केली पण शेवटी एक वर्षानी गुन्हा दाखल करावा लागला. गणपत पाटील यांना देखील चुकीच्या मेडिकल ग्राउंडवर जामीन न्यायालयाने दिला होता. याबद्दल देखील वरील कोर्टात अपील दाखल केले आहे.

 

 

आर्यनच्या आत्महत्येला दोन वर्षे उलटून गेली आहेत तरी देखील अजून शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी लाल भीतीमध्ये अडकला आहे. सचिन कागले यांच्या मुलग्याची अमानुष छळ केल्याची तक्रारी वर देखील कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे.

 

 

त्यामुळे आता आर्यनचे कुटुंबीय व समिती पुढे आंदोलन तीव्रता वाढवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. प्रशासनास, शिक्षण विभागास शाळेची मान्यता त्वरित रद्द करण्याची पावले उचलण्याचे आवाहन करीत आहोत. परिसरातील पालकांनाही आपली मुले या शाळेत शिकवू नका असे आवाहन करण्यात आले आहे
आमचा लढा हा कोणी एका व्यक्तिविरोधात नाही तर शिक्षणाचा धंदा करून त्यामध्ये विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालून त्यांचे बळी घेणाऱ्या व्यवस्थे विरोधात आहे.

 

यावेळी हेरंब बुडकर , प्रशांत कागले , रामचंद्र बुडकर , सचिन कागले , भानुदास माळी , बाबूराव पाटील , सतिश पाटील , संदीप पोर्लेकर आदिसह उपस्थित होते

चौकट
बेकायदेशीर पणे ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरण करणे शाळेवर गुन्हा दाखल शिरोली पुलाची येथील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूल शाळेने आंदोलनावर नजर ठेवण्यासाठी कोणत्या ही परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे ड्रोन कॅमेरा अवकाशात सोडून आंदोलनाचे चित्रीकरण केल्या प्रकरणी चेअरमन गणपत पाटील व श्रीनिवास खबाले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अशाप्रकारे महाराष्ट्रातील पहिला गुन्हा सिम्बॉलीक इंटरनॅशनल स्कूलवर करण्यात आला आहे

error: Content is protected !!