शिरोली पुलाची येथे भटक्या कुत्र्याचा लहान बालकांवर हल्ला

Spread the love

शिरोली पुलाची येथे भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने ५ लहान मुले जखमी

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

पुलाची शिरोली ता हातकणंगले येथे भटक्या कुत्र्याने ४ ते ९ वयोगटातील ५ मुलांचा चावा घेतल्याने ते जखमी झाले त्या कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .
शिरोली पुलाची येथील कोरगावकर काॅलणी , झेंडा चौक , गाव तलाव परिसरात सायंकाळी ६ वाजण्यासुमार भटक्या कुत्र्याने ४ ते ९ वयोगटातील उमेरा शेख ( वय ८ ) श्री लोखंडे ( वय ४ ) विवेण पवार ( वय ६ ) , जयद मुल्लानी ( वय ९ ) प्रिन्स कुमार ( वय ६ ) या ५ लहान मुलाना अंगणात खेळत असताना या कुत्र्याने त्यांचा चावा घेवून जखमी केले त्याना शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराठी नेले असता त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्याना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
कुत्र्याने चावा घेतल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना समजताच ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यानी परिसरातील नागरिकांना कुत्र्यापासून सावध राहण्याचे आवाहन करत कुत्र्याचा शोध घेतला पण अंधार पडल्याने कुत्र्याचा शोध घेणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने अवघड झाले .

error: Content is protected !!