शिरढोण / प्रतिनिधी
शिरढोण ता.शिरोळ येथे गुलमोहर हॉटेल जवळ टेम्पोला ओव्हरटेक करताना दोन दुचाकींची समोरा-समोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला.तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.सलिम समशेर इचलकरंजे(वय.49,रा.आलास, ता.शिरोळ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. दरम्यान साहेरा सलीम इचलकरंजे,फारूक कादर शेख(रा इचलकरंजी)हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.हा अपघात रविवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.सलिम इचलकरंजे हा दुचाकी होंडा ड्रीम युगा क्र(एम.एच.09 इ.जे 7788)वरून ईचलकरंजीकडे पत्नी साहेरा इचलकरंजे यांना घेऊन जात होते.तर फारूक शेख हा आपली दुचाकी बजाज सिटी 100 क्र(एम.एच.09,सी. वाय7090)वरून इचलजरंजीहुन कुरुंदवाडकडे जात असताना गुलमोहर हॉटेलजवळ इचलकरंजे हा टेम्पोला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या शेखला जोराची धडक दिल्याने इचलकरंजे याचे जमिनिवर डोके आपटल्याने तो जागीच ठार झाला.तर पत्नी साहेरा ईचलकरंजे आणि शेख हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.सांगली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.