पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
संदीप लोखंडे मृत्यूप्रकरणी पुलाची शिरोलीतील हॉटेल मालक व कर्मचारी यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पुलाची शिरोली येथील हॉटेल प्रिन्सचे मालक विकास सर्जेराव जाधव व तेथील वेटर बापू वाघी यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने तसे आदेश दिल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाय या गुन्ह्याचा तपासही करवीरचे डिवायएसपी सुजितकुमार शिरसागर यांच्याकडे देण्यात आला आहे.याबाबत पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी, संदीप मारुती लोखंडे हा पुलाची शिरोली • येथील हॉटेल प्रिन्स मध्ये नोकरी करत होता. १० ऑगस्ट २०२३ रोजी पहाटे तो बाथरूमला गेला होता. तेथेच तो मयत झाला होता.याबाबत संदीपचा भाऊ सागर मारुती लोखंडे यांनी हा अपघाती मृत्यू नसून घातपात असण्याची शक्यता व्यक्त केली होती.मात्र संदीपला औषधे चालू असल्याने तो आजारी होता.आणि त्यामुळेच बाथरूम मध्ये पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे त्यावेळी हॉटेल मालक व कामगारांच्याकडून सांगण्यात आले होते. सागर लोखंडे यांनी याबाबत पोलीस दिशाभूल करत असल्याचे सांगत थेट न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने खूनाच्या गुन्हे अंतर्गत हॉटेल मालक व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने हा गुन्हा शिरोली एम आयडीसी पोलिस ठाण्यात दाखल झाला. आहे. करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर हे पुढील तपास करीत आहेत