मोटरसायकल स्वराला वाचविण्याच्या नादात चारचाकी टेम्पो पलटी

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

हेरवाड ता.शिरोळ दरम्यानच्या कुरुंदवाड सलगर-सदलगा अचानक समोर आलेल्या मोटरसायकल स्वराला वाचविण्याच्या नादात चारचाकी टेम्पो उलटून चालक जखमी झाला आहे.पवन कुलकर्णी असे जखमी चालकाचे नाव आहे.ही घटना 6 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

 

दरम्यान, टेम्पो चालकाने प्रसंगावधान राखल्याने जीवितहानी टळली आहे.कुरुंदवाडहून बोरगावच्या दिशेने अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो जात होता.हेरवाड येथील आर.बी. पेट्रोल पंपासमोर दुचाकीला ओव्हरटेक करत असताना मोटरसायकल स्वराने अचानक पेट्रोल पंपाकडे वळण घेतल्याने टेम्पो चालकाने ब्रेक दाबून टेम्पो विरुद्ध दिशेला वळविल्याने सदरचा टेम्पो जागीच पलटी झाला.

 

 

या अपघातात टेम्पो चालक जखमी झाला आहे.अपघाताची वार्ता हेरवाडात पसरताच अस्लम गलगले,भाऊसाहेब माने,माणिक माने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन चालकाला बाहेर काढून रुग्णवाहिकेतून उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या अपघातात टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.

error: Content is protected !!