शिरोळात रविवारी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा
शिरोळ : प्रतिनिधी
येथील राजर्षी शाहू नगर वाचन मंदिर या वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारा राजर्षी शाहू ग्रंथालय मित्र पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते व वाचनालयाचे नियमित वाचक खंडेराव पार्वती शंकर हेरवाडे यांना जाहीर झाला असून रविवार दिनांक 2 जून 2024 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
शनिवार 1 जून 2024 रोजी राजर्षी शाहू वाचन मंदिर या ग्रंथालयाचा 146 वा वर्धापन दिन आहे.यानिमित्त शनिवारी सकाळी साडेआठ वाजता श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे प्राॅडक्शन मॅनेजर विश्वजीत शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यावेळी वाचनालयाचे सर्व पदाधिकारी सभासद आणि वाचक उपस्थित राहणार आहेत.
रविवार दिनांक 2 जून 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारा राजर्षी शाहू ग्रंथालय मित्र पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.सामाजिक कार्यकर्ते आणि वाचनालयाचे नियमित वाचक खंडेराव पार्वती शंकर हेरवाडे यांना राजर्षी शाहू ग्रंथालय मित्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश जडे यांच्या हस्ते व शिरोळ पालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.या निमित्ताने प्रकाश जडे व सौ स्मिता जडे यांचे लेकीचा काळीजगुज साधनारी बाप कविता या विषयावर व्याख्यान होणार आहे.
या समारंभास माजी खासदार राजू शेट्टी,माजी आमदार उल्हास पाटील,माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,दलित मित्र डॉ अशोकराव माने,श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव, दरगू गावडे, पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील,शिवप्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई, ज्येष्ठ पत्रकार विजय पवार,बाळासाहेब माळी,चंद्रकांत भाट यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.
तरी या राजर्षी शाहू वाचन मंदिराच्या वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष प्रा आण्णासाहेब माने गावडे उपाध्यक्ष एम एस माने कार्यवाह धनाजीराव जाधव आणि सर्व संचालकांनी केले आहे.