पुलाची शिरोलीत पोल्ट्रीला भीषण आग १० लाखांचे नुकसान, २०० पक्षी होरपळले

Spread the love

पुलाची शिरोलीत पोल्ट्रीला भीषण आग १० लाखांचे नुकसान, २०० पक्षी होरपळले

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

पुलाची शिरोली येथील वीटभट्टी माळावरील एका अत्याधुनिक पोल्ट्री फार्मला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली.ही आग बुधवारी पहाटे ४ वाजण्यासुमार लागली असल्याने पोल्ट्रीतील महागडे साहित्य व खाद्य जळून सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले असून, २०० पक्षी आगीत होरपळे असून स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात आली मोठा अनर्थ टळला.

पुलाची शिरोली ( ता हातकणंगले ) येथील वीटभट्टी माळावर शामराव मारुती पाटील यांची ५ गुंठे जागेत ५ हजार पक्षी क्षमतेची पोल्ट्री आहे. गेल्या सहा वर्षांपासून ते झाफा या कंपनीच्या करारावर पक्षी संगोपनाचा व्यवसाय करतात. पंधरा दिवसांपूर्वीच नवीन पक्ष्यांची बॅच पोल्ट्रीत आली होती. ही पोल्ट्री पूर्णपणे वातानुकूलित आणि स्वयंचलित (ऑटोमॅटिक) असल्याने आतमध्ये महागडे कुलर, ड्रायर व इतर यंत्रसामग्री बसवण्यात आली होती. पण बुधवारी पहाटे चारच्या सुमारास वीज मीटरमध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असे पाटील कुटुंबीयानी सांगितले या आगीने वायरिंग व शेडच्या बाजूला बांधलेल्या ताडपत्रीला आगीचा विळखा घातला आणि बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. ही बाब स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने धाव घेत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे उर्वरित हजारो पक्ष्यांचे प्राण वाचले.

या घटनेची माहिती मिळताच तलाठी व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या आगीत पोल्ट्रीचे शेड, महागडे वायरिंग, २४ कुलिंग पॅड, ५ ताडपत्री, पक्ष्यांची १८० भांडी, पाण्याचे पाईप, पक्ष्यांचे खाद्य जळून खाक झाले असून २०० पक्षी होरपळले आहेत. यामध्ये एकूण १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!