शिरोळ येथील इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील 58 हजार रुपयावरती अज्ञात चोरट्याने डल्ला

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

येथील छत्रपती शिवाजी चौकातील शिवाजी इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाच्या दरवाज्यास असलेल्या लोखंडी पट्टीला लावलेले कुलुप उचकटुन दुकानात प्रवेश करुन दुकानातील कांउटरमध्ये ठेवलेल्या बॅगेतील रोख 58 हजार रुपयावरती अज्ञात चोरट्याने डल्ला मारला आहे.

 

हि घटना रविवार दि 19 मे 2024 रोजी रात्री 9 वा ते सोमवार दि 20 मे रोजी सकाळी 9 वाच्या मुदतीत घडली आहे . या बाबतची फिर्याद रविंद्र शंकर मोहिते रा दत्त मंदिर जवळ शिरोळ यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात दिली आहे.

 

या बाबत अधिक माहिती अशी की छत्रपती शिवाजी चौक शिरोळ येथे शिवाजी इलेक्ट्रॉनिक्स या नावाने असलेल्या दुकानाच्या दरवाजाच्या लोखंडी पट्टीला लावलेले कुलुप अज्ञात चोरट्याने उचकटुन दुकानात

 

प्रवेश करुन दुकानातील कांउटरमध्ये ठेवलेल्या बॅगेतील 58 हजार रोख रक्कम चोरून नेली आहे.आज्ञात चोरट्या विरुद्ध शिरोळ पोलीसांत गुन्हा नोंद केला असुन अधिक तपास शिरोळ पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!