“दुःखद बातमी” आयशर ट्रकच्या धडकेत परप्रांतीय युवक जागीच ठार

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर श्रीराम टायर समोर आयशर ट्रकची पादचार्यास धडक दिल्याने परप्रांतीय पादचारी जागीच ठार आघातात मयताचे नाव शुभम राजभर( रा.गाजीपूर उत्तर प्रदेश सध्या रा चव्हाण बिल्डींग एच एम टी फाटा नागाव) असे असून या अपघाताची नोंद रात्री उशीरापर्यंत शिरोली पोलिसात झाली नव्हती.

पोलिसातून व घटनास्थळावरून माहितीनुसार शुभम राजभर हा शिरोली औद्योगिक वसाहतीमधील क्रृम अलाॅय या कंपनीत कामास होता.रविवारी रात्री आठ वाजण्यासुमार कामावरून सुट्टी करून तो आपल्या मित्रांसोबत रूमवर जात असताना आयशर ट्रक श्रीराम टायर जवळ आल्यावर पाठीमागून आयशर ट्रक (क्रमांक एम एच ०९ एल ३३८९) या ट्रकने परप्रांतीय पादचार्यास धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.नशीब बलवत्तर म्हणून सोबत असणारे त्याचे मित्र सुखरूप वाचले.
हा आयशर ट्रक आष्टा येथील एका खासगी कंपनीतून कास्टींग भरून शिरोली औद्योगिक वसाहती येथे काही मशिन शाॅप कंपनी उतरवीण्यासाठी येत असताना हा अपघात झाला .

error: Content is protected !!