कोल्हापुरात केएमटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप,बससेवा विस्कळीत

Spread the love

कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापूर महापालिकेच्या परिवहन विभागाच्या शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी आजपासून अचानक संप पुकारला.या अचानक पुकारलेल्या संपामुळे कोल्हापूरातील जवळ्पास 42 मार्गावरील बससेवा विस्कळीत

झाल्याने विद्यार्थी,व्यवसायिक,महिला प्रवाशांचे मोठी अडचणींचा सामना करावा लागला.कोल्हापूर महानगरपालिकेने केएमटी मधील रोजंदारीवर असलेल्या कामगारांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी,

महागाई भत्ता वाढवून द्यावा या आणि अशा अन्य विविध मागण्यासाठी कर्मचार्‍यांनी संप पुकारलाय,तसेच विविध मागण्यांसाठी केएमटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाबाबत केएमटी परिवहन युनियनचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक म्हणाले मागण्या मान्य होत नाही

तोपर्यत संप सुरू राहणार असल्याचे सांगितले. संपामुळे मात्र कोल्हापूरकरांची तारांबळ उडाली आहे. संपाबाबत तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

error: Content is protected !!