पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
टोप मकानसाहेब पिराच्या उरुसानिमित्त आयोजित कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकच्या कुस्तीत,जाधव आखाडा इस्लामपूरच्या अजय निकमने हप्ता डावावर गंगावेश तालीमीच्या संकेत पाटीलला चितपट केले.तर महिलांच्या कुस्तीत राष्ट्रकुल पदक विजेती वडनगेची रेश्मा माने हिने झोळी डावावर बावड्याच्या भाग्यश्री कांबळेला पराभूत केले.यावेळी मोठ्या संख्येने कुस्ती रसिक उपस्थित होते.
कुस्ती आखाड्याचे पूजन सरपंच तानाजी पाटील, उद्योगपती धनाजीराव पाटील यांच्या हस्ते व माजी सभापती डॉ. प्रदीप पाटील, उपसरपंच सुनील काटकर, बाळासाहेब चव्हाण, पिलाजी पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष मानसिंग गायकवाड, श्रीरंग तावडे, माणिक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
यावेळी अनेक लहान मोठ्या कुस्त्या अगदी रोमहर्षक झाल्या तर दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत पेरिडच्या कर्तार कांबळे यांनी घुटणा डावावर गगावेश तालमीच्या ऋतुराज मासाळकर ला चितपट केले.तर महिलांच्या कुस्तीत टोप च्या श्रावणी पाटील हिने बावड्याच्या वैष्णवीला चितपट केले.
कुस्ती मैदानात विजय झालेले मल्ल असे – धैर्यशील पाटील (टोप), तर विजय पुजारी(टोप), विजयी विरुद्ध दर्शन वाघमोडे(अंबप),मयुर भोसले (टोप)वि राज वाघमोडे (अंबप),बाळासो कोकरे( वारणा) वि.वि. ओम नाईक (मरळी),नवल वाघ (खोची) वि आदित्य माने (कळंबा),वैभव माने (पारगाव)वि गणेश जोंधळे (कासारवाडी),दुर्वेश फडतरे (राशिवडे) वि सौरभ जाधव,अंगद चौगुले(नागाव)वि पार्थ संकपाळ (वरणगे),पवन सगरे (पारगाव)वि संकेत पाटील (पाचगाव),ललित पाटील (शाहूवाडी) वि.कमलेश मदने (जाधववाडी),विश्वजीत पाटील (गंगावेश) वि.इंद्रजीत शेळके (आष्टा),जीवन लुगडे (बोरपाडळे)वि.वि विराज घारे (टीटवे),अविनाश चव्हाण (तळसंदे)वि.वि.महेश पाटील (टीटवे) शंकर माने (वारणा)वि सूरज पाटील (कोल्हापूर) याच बरोबर लहान मोठ्या कुस्त्या झाल्या.
यावेळी विजयसिंह घोरपडे,प्रकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिलीप मुळीक,विश्वास कुरणे,दीपक पाटील,बापू पोवार, बाळासो कोळी,अमोल पाटील, हिंदुराव मुळीक, उत्तम पाटील,गब्बर पाटील,अभिजित मुळीक,संदीप भोसले उपस्थित होते.
पंच म्हणून आकाराम कुरणे आनंदा पोवार, तुकाराम पाटील, यशवंत चौगुले, राजेंद्र वाघमारे, भैरवनाथ पाटील, विजय पाटील यांनी काम पहिले.