रोटरी हेरिटेजकडून राजाराम विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Spread the love

रोटरी हेरिटेजकडून राजाराम विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
जिल्हा परिषदेच्या शाळांतून मिळते दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण : चंद्रकांत भाट

शिरोळ / प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण मिळत असल्यामुळे या शाळेतील विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेत दैद्पीमान यश मिळवून आपल्या शाळेचे व गावाचे नाव उज्वल करीत आहेत असे विचार रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटीचे सदस्य चंद्रकांत भाट यांनी व्यक्त केले
रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटीच्या वतीने येथील राजाराम विद्यालय नं २ मधील विद्यार्थ्यांनी समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी चंद्रकांत भाट बोलत होते रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष संजय तुकाराम शिंदे सदस्य व मातोश्री चिल्ड्रन्स क्लिनिकचे प्रमुख बालरोगतज्ञ डॉ अतुल पाटील युवा उद्योजक अभिजीत माने यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट देऊन कौतुक केले.

 

समृद्धी प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षा 2023 24 मध्ये शाळेतील इयत्ता पहिली मधील रणवीर रणजीत जगदाळे याने 94 गुण केंद्रात प्रथम सृष्टी दीपक देशमुख 92 गुण केंद्रात द्वितीय वल्लभ सद्गुरुनाथ मोरे 82 गुण स्वाती तानाजी गावडे 74 गुण दुर्वा विजय पांडव 68 गुण श्रावणी अनिल पुजारी 58 गुण इयत्ता दुसरीमधील आराध्या गणेश जाधव 98 गुण राज्यात द्वितीय आर्यन अमर देशमुख 90 गुण केंद्रात तृतीय संस्कार शंकर पुजारी 90 गुण केंद्रात तृतीय दर्श मारुती जाधव 84 गुण रोहिताश रामफुल प्रजापत 78 गुण समर्थराज सुनील इंगळे 78 गुण आरोही सुधाकर गावडे 70 गुण आयुष् प्रकाश बेडगे 70 गुण दत्तराज अनिल पुजारी 54 गुण. इयत्ता तिसरीमधील पार्थ सचिन मांगले 116 गुण दुर्वा विजय गंगाधर 116 गुण वेदिका राजेंद्र पुजारी 106 गुण आदर्श प्रकाश कांबळे 100 गुण इयत्ता चौथीमधील सात्विकी प्रकाश बेडगे 156 गुण विश्वराज सद्गुरुनाथ मोरे 134 गुण दूर्वा उत्तम मोरे 118 गुण स्वराज संदीप धनगर 102 गुण आरोही महादेव मोरे 92 गुण श्रीवर्धन सागर पुजारी 88 गुण . या यशस्वी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.

 

शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे उपाध्यक्षा शितल जगदाळे मार्गदर्शक शिक्षक शाळेच्या मुख्याध्यापिका नीता चव्हाण अध्यापिका सुनंदा पाटील त्रिशला येळगुडे मीनाक्षी हेगाण्णा सनी सुतार यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले यावेळी युवा उद्योजक अभिजीत माने रोटरी हेरिटेज सिटीचे सदस्य सचिन सावंत शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या प्रियंका इंगळे सारिका सकट सदस्य मारुती जाधव स्वाती जगदाळे गणेश जाधव यांच्यासह शाळेतील विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!