कुरुंदवाड / प्रतिनिधी
रखरखत्या उन्हाच्या झळातही येथे व परिसरातील गावागावांत तरुणाईने व आबालवृद्धांनी रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला. तरुणाप्रमाणे तरुणींंनीही गटागटांनी फिरून आपल्या मित्र मैत्रिणींना रंगात न्हाऊन काढले. गाण्याच्या ठेक्यावर ताल धरत महिलांनी ही मोठ्या प्रमाणात रंगपंचमी खेळून आपला आनंद उत्सव साजरा केला.
होळी सणानंतर येणारा आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा हा सण म्हणजे रंगपंचमी होय. रंगपंचमी हा सण फाल्गुन कृष्ण पंचमीला येतो. या दिवशी लहान मुले ते अबालवृध्दापर्यंत विविध रंगांची उधळण होते. आज ग्रामीण व शहरी भागांमध्ये बाळ गोपाळाबरोबरच युवक, युवती रंग पंचमी खेळताना दिसत होते.
रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर बाजारामध्ये असणाऱ्या विविध आकाराच्या व रंगाच्या पिचकारी उपलब्ध झाल्या होत्या. या पिचका-यातून रंग उधळून रंगपंचमी साजरी केली. मित्र-मैत्रिणी आबालवृध्द रंगपंचमीच्या उत्सवात सहभागी झाले होते.
रंगपंचमीच्या निमित्ताने आज येथील सन्मित्र चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नगरपरिषद चौक, काळाराम मंदिर, ईगल चौक, भैरववाडी, विठ्ठल मंदिर, शिकलगार वसाहत व परिसरातील गावागावांमध्ये सर्वत्र रंगाची उधळण झाल्याने सर्वत्र रस्ते रंगमय झाले होते. सप्तरंगांची मुक्त उधळण करीत तरुणाई व महिलां मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्या होत्या. अंग भिजवत मुक्त रंग उधळत करीत लहान मुले, तरुणाई, महिला दिवसभर रखरखत्या उन्हात रंगपंचमी डॉल्बीच्या ठेक्यावर रस्त्यावर भान हरपून नाचत होत्या.
येथील गिरीश सिनेमा परिसरात महिला व शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साही वातावरणात रंगपंचमी खेळून आनंद उत्सव साजरा केला. डॉल्बीच्या ठेक्यावर नाचत महिलांंही रंग व पिचकारी मारत उत्साही वातावरणात रंगपंचमी साजरी केली.
. यामध्ये सुवर्णा सुतार, लता निटवे, सुवर्णा आलासे, शुभांगी साळुंखे, सुवर्णा सावंत, पुष्पा पाटील, शकुंतला जुगळे, विद्या घोरपडे, सारिका मेंगे, ज्योती कोरवी, सपना खंदारे, कल्याणी सपले, सारिका मोरे, नूतन नलवडे, रूपाली गायकवाड, स्नेहल जुगळे, निशा जुगळे, अशा महमदापुरे, अनघा झळके, मधुरा काकडे, तृप्ती बंडगर, रूपाली चौगुले यासह सागर जुगळे, नील निटवे, शुभम महाजन, गुरु महाजन, सौरभ चौगुले यांनी रंगपंचमी मोठ्या उत्साही बाजारात साजरी केली.